Home क्राइम वॉच कल्याणमधून पीएफआय संघटनेशी संबंधित एक जण पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरू

कल्याणमधून पीएफआय संघटनेशी संबंधित एक जण पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरू

 

कल्याण दि.२७ सप्टेंबर : 

काही दिवसांपूर्वी देशाच्या विविध राज्यांतून पीएफआय (pfi)संघटनेशी संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता कल्याणमधूनही याच संघटनेशी संबंधित एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाणे आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने ही संयुक्त कारवाईं केली आहे.

कल्याण पश्चिमेच्या रोहीदास वााडा परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले असून आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. मात्र या व्यक्तीने कोणतेही चुकीचं कृत्य केलं नसून आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

देशविरोधी काम सुरू असल्याचा ठपका ठेवत देशभरात पीएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने कारवाई सुरू केली आहे.

मागील लेखआता केडीएमसीतील अधिकाऱ्यांची कार्यालये टाकणार कात; माझे कार्यालय – स्वच्छ कार्यालय स्पर्धेची घोषणा
पुढील लेखदेवीच्या नऊ रूपांचे माहात्म्य सांगत आहेत ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा