Home ठळक बातम्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त कल्याणातील बिर्ला महविद्यालयातर्फे शांतता पदयात्रेचे आयोजन

महात्मा गांधी जयंतीनिमित्त कल्याणातील बिर्ला महविद्यालयातर्फे शांतता पदयात्रेचे आयोजन

कल्याण दि.२ ऑक्टोबर :

कल्याणातील सुप्रसिद्ध बी. के. बिर्ला महाविद्यालयातर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त शांतता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बिर्ला महाविद्यालयातील विद्यापीठ अनुदान आयोग अनुदानित गांधी अभ्यास केंद्रातर्फे ही शांतता पदयात्रा काढण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरीश दुबे यांच्यासह उपप्राचार्य विपिनचंद्र वाडेकर आणि आयझॅक जेरी आदी मान्यवरांच्या हस्ते बापूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.

आजच्या पिढीला महात्मा गांधींच्या विचारांची जाणीव व्हावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या गांधी अभ्यास केंद्रातर्फे दरवर्षी या यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेत उर्दू नॅशनल हायस्कूल, सरस्वती विद्यालयासह विविध शैक्षणिक संस्थांमधील हजारो विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा दलाचे सदस्य एनसीसी, एनएसएस आणि महाविद्यालयातील इतर शाखांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या पदयात्रेदरम्यान महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यांनी सजवलेले शांतता रथ आणि गांधी विचारांची फलक घेऊन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर महात्मा गांधी यांचे आवडते स्तोत्र म्हणून आणि त्यांच्या तत्त्वांचे पालन करण्याची शपथ घेऊन कॉलेजमध्येच या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यानी बापूंचे तत्व जीवनात अंगीकारण्याचे युवा पिढीला सांगितले. त्यांच्या मते स्वच्छता हा बापूंच्या विचारांचा महत्त्वाचा दुवा आहे. गांधी अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. अर्चना सिंग यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे आयोजक डॉ. श्यामसुंदर पांडे यांनी गांधी विचार आजच्या वातावरणासाठी अतिशय समर्पक असल्याचे सांगून सर्व पाहुण्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.धीरज शेखावत, डॉ.दिनेश वानुले, डॉ.नारायण तोटेवाड, डॉ.वृंदा निशाणदार, अनिल तिवारी, डॉ.सुवर्णा जाधव, डॉ.भरत बागुल, डॉ.मेघा देवळे, डॉ.प्रकाश संसारे, डॉ. आनंद धर्माधिकारी., प्रा. गणेश कुमावत, के. एच.डोंगरे, किरण रायकर, प्रा. भूषण निकम, प्रा. ज्योती थोरात, अखिलेश आदी प्राध्यापकांच्या अथक सहकार्याने करण्यात आले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा