Home ठळक बातम्या कल्याणात २३ मजली इमारतीमध्ये लागलेल्या आगीत दोन फ्लॅट भस्मसात

कल्याणात २३ मजली इमारतीमध्ये लागलेल्या आगीत दोन फ्लॅट भस्मसात

 

कल्याण दि. २ ऑक्टोबर :
कल्याणच्या खडकपाडा भागात असणाऱ्या २३ मजली हाय प्रोफाईल इमारतीमध्ये लागलेल्या आगीत २ फ्लॅट जळून भस्मसात झाले. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. (Two flats gutted in a fire in a 23-storey building in Kalyan)

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा भागात मोहन अल्टीजा ही २३ मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये आज सकाळच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला. तर आग लागल्यानंतर इमारतीच्या लिफ्टमध्ये दोन जण अडकून पडले होते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका केली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही फ्लॅटचे मोठे नुकसान झाले आहे. तर आगीचे प्रमुख कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मागील लेखआत्महत्या प्रकरणात भाजपा कार्यकर्त्याच्या काही संबंध नाही – भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे
पुढील लेखमहात्मा गांधी जयंतीनिमित्त कल्याणातील बिर्ला महविद्यालयातर्फे शांतता पदयात्रेचे आयोजन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा