Home ठळक बातम्या पडघा उपकेंद्रात बिघाड: कल्याण डोंबिवली,अंबरनाथ बदलापूरच्या काही भागात वीजपुरवठा खंडित

पडघा उपकेंद्रात बिघाड: कल्याण डोंबिवली,अंबरनाथ बदलापूरच्या काही भागात वीजपुरवठा खंडित

प्रातिनिधिक छायाचित्र

कल्याण – डोंबिवली दि. २६ एप्रिल :
एकीकडे असह्य उन्हामुळे लोकं हैराण झाले असताना तांत्रिक बिघाडामुळे खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याने त्यात भर पडली आहे. पडघा येथील महापारेषणच्या 400 KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे कल्याण, डोंबिवलीसह अंबरनाथ आणि बदलापूरच्या काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असून पुढील अर्धा ते पाऊण तासात हे काम होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पडघा ते पाल या 220 KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू होण्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मागील लेखकल्याणच्या विविध भागांत पोलिसांनी काढला ‘रुट मार्च’
पुढील लेखखवय्यांसाठी पर्वणी ; डोंबिवलीत 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान मिसळ महोत्सवाचे आयोजन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा