Home ठळक बातम्या डोंबिवलीत काडेपेटीच्या काड्यांपासून साकारण्यात आले ‘शिवराय’

डोंबिवलीत काडेपेटीच्या काड्यांपासून साकारण्यात आले ‘शिवराय’

 

डोंबिवली दि.27 जानेवारी :
डोंबिवलीतील कलाकार श्रद्धा पाटीलने छत्रपती शिवाजी महाराजांची अनोखी भव्य प्रतिमा डोंबिवलीमध्ये साकारली. काडेपेटीच्या 19 हजार 800 काड्यांपासून 36 तासांत ही अप्रतिम प्रतिमा साकारण्यात आली आहे.

येत्या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. मात्र केवळ शिवजयंतीला महाराजांची आठवण न काढता नेहमीच त्यांचा जयजयकार केला पाहिजे. महाराजांना एक मानवंदना म्हणून डोंबिवलीच्या सांगावेश्वर मंदिरात ही 10 बाय 10 फुटांची महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
आपला हा पहिलाच प्रयत्न असून यापेक्षा मोठ्या आकारातील प्रतिमा साकारण्याचे आपले लक्ष्य असल्याचे श्रद्धा पाटीलने सांगितले. या कामात श्रद्धाला फक्तराजे प्रतिष्ठान डोंबिवली आणि सागावेश्वर मित्रमंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा