Home ठळक बातम्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी कल्याणात निघणार अभूतपूर्व ‘तिरंगा रॅली’

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी कल्याणात निघणार अभूतपूर्व ‘तिरंगा रॅली’

 

कल्याण दि.१० ऑगस्ट :
यंदा देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असून केंद्र सरकारतर्फे हर घर तिरंगा उपक्रमाने त्याचा प्रारंभ होणार आहे. याच अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वूमीवर कल्याणात येत्या १२ ऑगस्ट रोजी केडीएमसी, पोलीस प्रशासन, बिर्ला कॉलेज आणि विविध सामाजिक संस्था नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत इंडिया गेटवर होणाऱ्या संचलनाच्या धर्तीवर ही तिरंगा रॅली निघणार असल्याची माहिती कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली.

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजपासून या तिरंगा रॅलीची सुरुवात होणार असून खडकपाडा सर्कल, आधारवाडी सर्कल, दुर्गाडी चौक, लालचौकी, सहजानंद चौक, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक आणि महापालिका मुख्यालयाकडून सुभाष मैदान येथे समारोप होणार आहे. बिर्ला कॉलेज येथून सकाळी ८ वाजता ही येथून सुरुवात होणार असून त्यामध्ये कल्याणातील विविध कॉलेजेस, शाळेचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, नामांकित व्यक्तींचा सहभाग असेल. तर या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून विविधतेतील एकता सांगणारे चित्ररथ, विविध वेशभूषा, कला संस्कृती यांचेही दर्शन घडणार असल्याचे एसीपी माने पाटील यांनी सांगितले.

तर सकाळी ८ ते सकाळी १० अशी दोन तास ही रॅली चालणार असून त्याच्या मार्गाच्या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहनही एसीपी उमेश माने पाटील यांनी केले.

दरम्यान या तिरंगा रॅलीच्या आज झालेल्या नियोजनपूर्व बैठकीला केडीएमसीचे सचिव संजय जाधव, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, कल्याण हॉटेल ओनर्स असोसिशनचे प्रविण शेट्टी, केडीएमसी शिक्षण विभागाचे विजय सरकटे,  यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा