Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा ;नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा ;नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

 

आवश्यकता नसल्यास दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडू नका

ठाणे दि.14 मार्च :
भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यातही उद्यापासून पुढील 2 दिवस (१६ मार्चपर्यंत ) उष्णतेची लाट (हीटवेव) येण्याची वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या काळात दुपारी 12 ते 4 या दरम्यान शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने १४ ते १६ मार्च दरम्यान मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही उष्णतेची लाट जाणवणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी काय करावे याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी विविध उपाय सांगितले आहेत.

अशी घ्या काळजी…

दुपारच्या वेळेस शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे,

तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे,

हलके, पातळ आणि सुती कपडे वापरावेत,

बाहेर जाताना सनग्लासेस, स्कार्फ, छत्री, टोपी यांचा वापर करावा,

प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी,

उन्हात काम करत असणाऱ्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा छत्रीचा वापर करावा

ओल्या कपड्याने डोके, चेहरा झाकावा आदी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

 

आज नोंदवले गेलेलं तापमान…

कर्जत – ४१.३
कोपरखैरणे – ४०.६
कल्याण – ४०.४
डोंबिवली – ४०.४
बदलापूर – ४०.४
मनोर – ४०.४
ठाणे – ४०.४
भिवंडी – ४०.४
पनवेल – ४०.३
तळोजा – ४०.३
उल्हासनगर – ४०.२
मुंब्रा – ४०.२

(तापमान माहिती सौजन्य :- अभिजित मोडक, हवामान अभ्यासक)

ठाणे जिल्ह्यात गुरुवारपर्यंत 40 ते 42 च्या दरम्यान तापमान राहणार – अभिजीत मोडक

मुंबईत पुढील 2 दिवस तपमान वाढ होण्याची शक्यता असली तरी ठाणे जिल्ह्यात मात्र होळीपर्यंत म्हणजेच गुरुवारपर्यंत तापमानात वाढ जाणवू शकते. आजपासूनच ही तापमान वाढ बघण्यास मिळत असून आज ठाणे जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. तर गुरुवारपर्यंत त्यात वाढ होऊन ते 42 डिग्री सेल्सियसपर्यँत पोहचण्याचा अंदाज खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ झाल्याने नागरिकांची लाही लाही होत होती. उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे कोकणातील तापमानात वाढ होत असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. गुजरात आणि राजस्थानवर तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्याने ही तापमानात वाढ होते आहे. समुद्रकिनारी असलेल्या शहरांमध्ये समुद्रावरून येणारे वारे उशिरा येत असल्याने कमी झालेली हवेतील आर्द्रता हीदेखील तापमान वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे मोडक यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा