Home कोरोना 45 वर्षांवरील नागरिकांचे उद्या 7 मे रोजी कल्याण डोंबिवलीत या 16 ठिकाणी...

45 वर्षांवरील नागरिकांचे उद्या 7 मे रोजी कल्याण डोंबिवलीत या 16 ठिकाणी होणार कोवीड लसीकरण

 

कल्याण – डोंबिवली दि.6 मे :
उद्या शुक्रवारी 7 मे 2021 रोजी कल्याण डोंबिवलीमध्ये 16 केंद्रांवर होणार लसीकरण होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते लस संपेपर्यंत हे लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 45 वर्षावरील नागरिक तसेच हेल्थ केअर वर्कर्स, फ्रन्टलाइन वर्कर्ससाठी कोविशील्डचा 2 रा डोस कल्याण पूर्वेत प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र (महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला) आणि डोंबिवली पूर्वेत सावळाराम क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली येथे दिला जाणार आहे.

तर उर्वरित 14 लसीकरण केंद्रांवर हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्डचा 1 ला आणि 2 रा डोस देण्यात येणार आहे.

तर कोवॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची व्यवस्था करण्यात येईल.

१ कॉमेंट

  1. छान सेवा सूचित केल्या बद्दल धन्यवाद
    Online Registration होत नाहीये
    Queue लावून टोकन घ्यायचा का
    अपंग, एकट्या ज्येष्ठ नागरिकांना काही सोय आहे का
    हे ही नमूद करावे
    विनम्र विनंती

Leave a Reply to GOPAL+PILLAI प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा