Home कोरोना दिव्यांगांसह निराधार महिलांचे मोफत लसीकरण; आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार

दिव्यांगांसह निराधार महिलांचे मोफत लसीकरण; आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार

 

कल्याण दि.9 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयात जाऊन सशुल्क लस घेणं गरिबांना परवडत नसल्यानं केडीएमसीच्या लसीकरणावर नागरिक अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मुलाचा थाटात विवाह सोहळा न करता त्या खर्चात मतदारसंघातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे आश्वासन दिलं होतं. त्यानूसार आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात दिव्यांग बांधवांसह निराधार महिलांच्या मोफत लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली.

आजपासून पुढील 3 दिवस हे लसीकरण सुरू राहणार असून त्यात 2 हजार नागरिकांचे लसीकरण करणार असल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. तसेच नागरिकांचे लसीकरण झाल्यानंतर आपण स्वतः लसीकरण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केडीएमसीकडून महापालिका क्षेत्रात मोफत लसीकरण केले जात आहे. मात्र त्यामध्ये सातत्याचा आणि पुरेसा लससाठा उपलब्ध होण्याचा अभाव असल्याने इच्छा असूनही अनेक नागरिक ही मोफत लस घेऊ शकत नाहीये. या पार्श्वभूमीवर आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मुलाचा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने करत त्या खर्चातून मतदारसंघातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानूसार आमदार गायकवाड यांनी आजपासून पुढील 3 दिवस हे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे. आजच्या पहिल्याच दिवशी याठिकाणी दिव्यांग, रिक्षाचालक, घरकाम करणा-या महिलांनी लसीकरणासाठी मोठी गर्दी केली होती.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 57 रुग्ण तर 68 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याणच्या वैद्यकीय सेवेत मैलाचा दगड; दुर्मिळ अशी जुळ्या गर्भपाताची यशस्वी प्रक्रीया

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा