Home ठळक बातम्या दुर्गाडी पुलावर केडीएमटीची बस बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी

दुर्गाडी पुलावर केडीएमटीची बस बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी

कल्याण दि.8 फेब्रुवारी :
पुलाचे आणि रस्त्याचे काम सुरू असल्याने आधीच धीम्या गतीने वाहतुक सुरू असतानाच दुर्गाडी पुलावर आज सकाळी 9 वाजता केडीएमटीची बस बंद पडली. ऐन सकाळच्या वेळेत झालेल्या या प्रकाराने दुर्गाडी पूलासह आसपासच्या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आता वाहतुुक सुुरळीत सुुरु आहे.
पत्रीपुलाचे काम पूर्ण झाल्याने आता सकाळच्या सुमारास दुर्गाडी पूल आणि चौकामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. अशातच आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुर्गाडी पुलाच्या मधोमधच केडीएमटीची बस बंद पडली. त्यामूळे सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचे मोठे हाल झाले.
अखेर वाहतूक पोलिसांनी मोठ्या मुश्किलीने ही बस बाजूला केली आणि इथली वाहतुक कोंडी फोडली. मात्र तोपर्यंत सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचे व्हायचे ते हाल झालेच होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी केडीएमटीच्या नावाने अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहील्याचे दिसून आले.
दरम्यान कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावर नादुरुस्त बसेस उतरवू नका असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केडीएमटीला केले होते. मात्र त्यानंतर केडीएमटीकडून कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचे या बंद पडलेल्या बसवरून दिसून आले.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 77 रुग्ण तर 104 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.
पुढील लेखडोंबिवलीमध्ये मनसेचे डॅमेज कंट्रोल सुरू; कार्यकर्ता मेळाव्याद्वारे मनसेचे शक्तिप्रदर्शन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा