Home ठळक बातम्या गर्डरच्या कामासाठी मुंब्रा बायपास आज रात्रीपासून 24 तास राहणार बंद; या मार्गावरून...

गर्डरच्या कामासाठी मुंब्रा बायपास आज रात्रीपासून 24 तास राहणार बंद; या मार्गावरून वळवली वाहतूक

 

ठाणे दि.6 मार्च :
मध्य रेल्वेच्या ठाणे- दिवा या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचे (thane-diva 5th and 6th railway line work) काम शेवटच्या टप्प्यात आले असून मुंब्रा बायपास मार्गावर रेल्वेपूलाचे गर्डर उभारणीचे काम दोन दिवस करण्यात येणार आहे. त्यामूळे मुंब्रा बायपास (mumbra bypass will remain closed for 24 hours) हा रविवार ७ मार्च 2021 आणि रविवार २१ मार्च 2021 या दोन दिवशी वाहतुकीसाठी 24 तास बंद राहणार आहे. त्यामूळे या मार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

जेएनपीटीकडून (jnpt)मुंब्रा बायपासमार्गे नाशिक, भिवंडी आणि ठाणे ग्रामीणकडे जाणाऱ्या वाहनांना कळंबोली सर्कल, न्हावडे फाटा, तळोजे, एमआयडीसी, उसाटणे, खोणी, नेवाळीमार्गे, कल्याणमधून दुर्गाडीमार्गे भिवंडीकडे जाता येईल येणार आहे. तर नाशिकडे जाणारी वाहने आधारवाडी, बांपगांव, पडघा नाका येथून मुंबई-नाशिक महामार्गावरून नाशिककडे जाऊ शकतील.

तर ठाण्यातून (thane) जाण्यासाठी कल्याणफाटा, शिळफाटा येथून महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर टोलनाक्यावरून घोडबंदर रोडने माजीवड्यामार्गे जाता येईल. तर गुजरात, पालघर येथून घोडबंदरमार्गे येणाऱ्या वाहनांना घोडबंदर रोडवरून ऐरोलीमार्गे नवी मुंबईला (navi mumbai) जाऊ शकणार आहेत. तसेच नाशिकडून येणाऱ्या वाहनांनाही कल्याणमार्गे नवी मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.

तर मुंब्रा शहरातून ठाणे-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मुंब्रा वाय जंक्शन, शिळफाटा, उजवीकडे वळण घेऊन महापे रोड, रबाळे, ऐरोली मार्गे मुंबईकडे जाता येईल. तसेच पुढे दिवा, विटावा, कळवा खाडी ब्रिजमार्गे ठाण्याकडेही जाणारा पर्यायी मार्ग उपलब्ध असणार आहे.

गेल्या ८ ते १० वर्षापासून सुरू असलेले ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (mrvc mumbai rail vikas corporation) माध्यमातून सुरू असून सध्या ते अंतिम टप्प्यात आहे. मुंब्रा बोगद्यातून रेल्वे रूळ खाडीवरील उन्नत रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ अर्थात मुंब्रा बायपास रस्त्यावर लोखंडी रेल्वे पुलाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. या पुलाच्या जोडणीकरता दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून ते ऱविवारी मध्यरात्रीपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने हा मार्ग 7 मार्च आणि 21 मार्च रोजी वाहतुकीसाठी 24 तास बंद ठेवण्यात (Mumbra Bypass To Remain Closed On 7 And 21 March) येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आजही आढळले कोरोनाचे 210 रुग्ण तर 169 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेख‘राहण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणा’त कल्याण डोंबिवली देशात 12 व्या स्थानी ; नाशिक,नागपूर, पिंपरी चिंचवडला टाकले मागे

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा