Home ठळक बातम्या मानवी वस्तीत शिरलेल्या 6 फुटी अजगराची वॉर रेस्क्यूकडून सुटका

मानवी वस्तीत शिरलेल्या 6 फुटी अजगराची वॉर रेस्क्यूकडून सुटका

 

कल्याण दि.13 जून :
गेले काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याने सरपटणारे जीव मानवी वस्तीत शिरले होते. अशाच एका 6 फुटी भारतीय अजगराची वॉर रेस्क्यू संस्थेच्या सर्पमित्रांकडून सुटका करण्यात आली.
काल रात्री 10:30 च्या सुमारास मलंगगडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या म्हात्रे कुटुंबियांच्या अंगणात 6 फुटी अजगर आढळून आला. त्यावर म्हात्रे यांनी लगेच वाॅर रेस्क्यूच्या हेल्पलाइनवर काॅल करून याबाबत माहिती दिली. वॉर रेस्क्यूचे सर्पमित्र कुलदीप चिकनकर, राज गायकर, मुंबई पोलीस मुरलीधर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत या अजगराला सुरक्षित पकडून कल्याण वनविभागाच्या स्वाधीन केले. या अजगराला लवकरच निसर्गमुक्त करण्यात येईल अशी माहिती वनपाल मच्छिंद्र जाधव यांनी दिली.

मागील लेखकल्याण ग्रामीण भागात सुरू झाला अनोखा फिरता दवाखाना उपक्रम
पुढील लेखडोंबिवलीत एक रुपयात एक लिटर पेट्रोल; पेट्रोल भरण्यासाठी भलीमोठी रांग

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा