Home कोरोना कल्याण डोंबिवलीत खासगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरू – आमदार राजू पाटील...

कल्याण डोंबिवलीत खासगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरू – आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

 

सर्व यंत्रणा उपलब्ध करूनही केडीएमसी आपल्याला लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देत नाही, : आमदारांचा गंभीर आरोप

डोंबिवली दि.13 जून :
कल्याण ग्रामीणमध्ये आपण स्वखर्चाने लसीकरणासाठी लागणारे दवाखान्याचे पाठबळ आणि मनुष्यबळ देण्याची तयारी दाखवूनही केडीएमसीकडून अद्याप लसीकरण केंद्राला परवानगी दिली नसल्यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा महापालिका प्रशासनावर टिकास्त्र सोडले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 1 ले खासगी लसीकरण केंद्र आजआमदार राजू पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत कासाबेला पलावा इथे सुरू झाले.

कोरोना विरूद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण होणे खुप महत्वाचे आहे. परंतु कोरोनाबाबतीत सपशेल तोंडघशी पडलेली केडीएमसीची आरोग्य यंत्रणा लसीकरणात पण निराशाजनक कामगीरी करत असल्याची टिका आमदार पाटील यांनी यावेळी केली. तसेच कल्याण ग्रामीणमध्ये आपण स्वखर्चाने लसीकरणासाठी लागणारे दवाखान्याचे पाठबळ आणि मनुष्यबळ देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतरही लसीचे डोस तर दुरच मात्र लसीकरण केंद्रास साधी परवानगीही अद्याप देण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप आमदार राजू पाटील यांनी केला. तसेच या सर्व सोपस्कराला कंटाळून लोकांनी परवडेल त्याठिकाणी खासगी दवाखान्यांच्या मदतीने लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर येत्या काही दिवसात आपण मागणी केलेल्या लसीकरण केंद्रास केडीएमसीकडून परवानगी मिळून या नागरिकांना दुसरा डोस तरी मोफत मिळेल असा आशावादही आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान कासाबेला पलावा येथे सोसायटी आणि फेडरेशनच्या संयुक्त प्रयत्नाने आजपासून लसीकरण सुरू झाले. केडीएमसी हद्दीतील हे पहिलेच खासगी लसीकरण केंद्र असून आज पहिल्या दिवशी सुमारे ५८० लोकांनी याठिकाणी लस घेतली.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत उद्या (14 जून) 21 ठिकाणी लसीकरण; परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार लस
पुढील लेखस्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सरसावली युवासेना

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा