Home ठळक बातम्या ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

 

डोंबिवली दि.26 जुलै :
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीत ठिक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. सध्या कोपर पुलाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वापर होणारा ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरही काही वेगळं नाहीये. या पुलाच्या पश्चिमेच्या रस्त्यावर सध्या मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी वाहतुक कोंडीच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. बऱ्याचदा सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेला खड्ड्यांमुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती एलएनएन सिटीजन रिपोर्टर विश्वनाथ शेनॉय यांनी दिली.
दरम्यान नेहमीप्रमाणे या खड्ड्यांचे खापर पावसावर फोडले जाईल आणि हात वर केले जातील. मात्र खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी उपाययोजना करण्याची इच्छाशक्ती सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये कधी निर्माण होईल? याचे उत्तर शोधण्यासाठी आणखी किती पावसाळे जावे लागतील कोणास ठाऊक…

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 87 रुग्ण तर 125 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 102 रुग्ण तर 92 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा